संस्थेची माहिती

कृषि उत्पन्न बाजार समिती, सटाणा

अ.क्र. मूलभूत माहिती तपशील
1 स्थापना दि. २४ सप्टेंबर १९४८
2 इ-मेल am_satana@msamb.com / apmcsata@gmail.com
3 फोन क्रमांक 02555-223014/223062
4 बाजार समितीचा नोंदणी क्र. ५५००/४५ (अ)
5 बाजार समितीचा पॅन नं. AAALT0613L
6 बाजार समितीचा GST No. 27AAALT0613L1ZY
7 उद्देश शेतमालाची उघडपणे लिलाव पध्दत व समितीच्या परवानाधारक हमाल-मापाऱ्यांकडून चोख वजनमाप व देखरेख.सटाणा मुख्य बाजार येथे 60 मेट्रीक टन क्षमतेचे इलेक्ट्रॉनिक भुईकाटा.

बाजार आवार -

1) मुख्य बाजार आवार, सटाणा (क्षेत्र 8 हेक्टर 68 आर)

सटाणा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सटाणा हे मुख्य बाजार आवार असुन सटाणा-मालेगाव रोडलगत बाजार समितीची स्वमालकीची 8 हे. 68 आर जागा आहे. सदर जागेत बाजार समितीचे मुख्य कार्यालयासह व्यापारी संकुल व इतर बांधकामे केलेली आहेत. सदर बाजार आवारातील वाहनतळाचे संपुर्ण कॉक्रीटीकरण करण्यात आले असुन त्यावर दैनंदिन शेतीमाल लिलाव केले जातात. समितीचे मुख्य बाजार आवारावर कांदा, भुसार शेतीमाल, डाळिंबचे दैनंदिन लिलाव होतात. दर शनिवारी शेळी-मेंढी जनावरे बाजार भरतो. तसेच कांदा व भुसार शेतीमाल लिलावासाठी स्वंतत्र कॉक्रीटीकरण असलेल्या वाहनतळाची सुविधा केलेली आहे/p>

उपबाजार आवार -

1. उपबाजार डांगसौंदाणे (क्षेत्र 2 हेक्टर 70 आर)


शेतीमाल विक्रीची पद्धत

कृषि उत्पन्न बाजार समिती, सटाणा ही ग्रामीण भागातील शेतक-यांची विश्वासपात्र अशी बाजारपेठ असुन बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार आवारावर विक्रीस येणारा शेतीमाल हा उघड लिलाव पद्धतीने विक्री केला जातो. बाजार समितीचे सेवक लिलावाचे ठिकाणी उपस्थित असतात व त्यांचे मार्फत माल विक्रीची नोंद ठेवली जाते. समितीचे मुख्य बाजार आवारावर प्रामुख्याने कांदा, भुसार शेतीमाल, नागवेली पाने, भाजीपाला व जनावरे यांचे खरेदी-विक्रीचे मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात. बाजार समितीत शेतीमाल विक्री केल्यानंतर माल विक्रीची रक्कम तात्काळ रोख स्वरुपात अदा केली जाते. त्यामुळे शेतीमाल विक्री होवून शेतक-यांना लवकरात-लवकर घरी जाता येत असल्याने तालुका व तालुक्याबाहेरील, तसेच जिल्ह्याबाहेरील शेतकरी बाजार समितीत शेतीमाल विक्रीस पसंती देतात. माहिती तंत्रज्ञानाच्या व स्पर्धेच्या युगात दैनंदिन शेतीमाल खरेदी-विक्रीचे लिलाव पद्धतीत काळानुरुप बदल करणे आवश्यक असल्याने सदरची प्रक्रिया ऑनलाईनरित्या करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेची संगणकीय लिलाव पद्धतीची अंमलबजावणी सुरु असुन प्रथमतः भुसार शेतीमालासाठी ई-लिलाव सुरु करणेकामी बाजार समिती व्यवस्थापन प्रयत्नशील आहे.


मागील 5 वर्षाचे उत्पन्न-खर्च वाढावा/तुट

अ.क्र. साल उत्पन्न खर्च वाढावा
1 २०२०-२१ 4,24,19,124 3,35,36,218 88,82,906
2 २०२१-२२ 4,90,75,264 3,53,16,698 1,37,58,566
3 २०२२-२३ 4,52,99,724 3,96,62,733 56,36,991
4 २०२३-२४ 4,95,14,679 3,88,10,465 1,07,04,214
5 २०२४-२५ 4,27,63,643 3,94,27,970 33,35,673

१)बाजार समितीचे परवानाधारक आडते/व्यापारी, हमाल ,मापारी यांची माहिती

बाजार समितीचे नाव तपशिल संख्या
कृषि उत्पन्न बाजार समिती, सटाणा 1)आडत्या 115
2)अ वर्ग खरेदीदार 156
3) प्रक्रिया 4
4) हमाल 83
5) मापारी 32

२) बाजार समिती लेखापरीक्षण स्थिती

अ.क्र. लेखापरिक्षण कालावधी लेखापरीक्षकाचे नाव सद्यस्थिती
1 2023-24 श्री. डि.आर.पाटील, विशेष लेखापरिक्षक, वर्ग-2 सहकारी संस्था, (पणन) नाशिक लेखापरिक्षण पूर्ण
2 2024-25 --- लेखापरिक्षण लवकरच सुरु होणार आहे.
Top